आपले संविधान भाग ७

 भारतीय संविधानाविषयी महत्वपूर्ण प्राथमिक माहिती मागील भागांमध्ये बघितल्यानंतर आजपासून आपण आपल्या संविधानाच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न करणार आहोत.

   आपल्या संविधानाच्या २२ भागांपैकी पहिल्या भागातील अनुच्छेद एक बाबत आज आपण जाणून घेऊया.

               भाग - ०१

       संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र

अनुच्छेद १: संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र 

१. India, that is Bharat, shall be a union of states.  इंडिया, अर्थात भारत, हा राज्याचा संघ असेल.

२. राज्य व त्यांची राज्यक्षेत्रे पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील.

३. भारताचे राज्यक्षेत्र;

     १) राज्यांची राज्यक्षेत्रे;

     २) पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केलेली संघ राज्यक्षेत्रे; आणि

     ३) संपादित केली जातील अशी अन्य राज्यक्षेत्रे मिळून बनलेले असेल.


   संविधानाची सुरवातच India that is Bharat अशी आहे. इंडिया अर्थात भारत हेच आपल्या देशाचे अधिकृत संविधानिक नाव आहे.  पुढे म्हटलय की, भारताची निर्मिती ही त्याचे संघराज्य व केंद्रशासित प्रदेशांची मिळून होते. म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ आहे. सध्या भारतात कलम ३७० हटविल्यानंतर एकूण २८ संघराज्य व ९ केंद्रशासित प्रदेश आहेत.

    क्रमशः

       संकलन:- नुरखाॅं पठाण

                       गोरेगाव-रायगड

Comments

Popular posts from this blog

आपले संविधान भाग४: भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये

आपले संविधान भाग-१७

आपले संविधान भाग ६: संविधानाचे प्रास्ताविक