आपले संविधान भाग-२७

भाग तिसरा-मुलभूत अधिकार

   आज आपण धार्मिक संस्था मध्ये पद भरण्याबाबत तरतूद असणारे अनुच्छेद-१६ मधील नियम 5 बाबत माहिती घेऊया...

  अनुच्छेद-१६:- सार्वजनिक सेवा योजनाच्या बाबींमध्ये समान संधी--

   5:- या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे, एखाद्या धार्मिक किंवा सांप्रदायिक संस्थेच्या कारभाराशी संबंधित असलेल्या पदाचा किंवा तिच्या शासक मंडळाचा कोणताही सदस्य म्हणजे विशिष्ट धर्माची अनुयायी असणारी किंवा एखाद्या विशिष्ट संप्रदायाची व्यक्ती असली पाहिजे, अशी तरतूद करणाऱ्या कोणत्याही कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही.

    म्हणजेच धार्मिक किंवा सांप्रदायिक संस्थांमध्ये नोकऱ्यांबाबत धर्मावर आधारित आरक्षण देण्याबाबत तरतूद ह्या कलमामध्ये करण्यात आली आहे.

   उदा. एखादे खाजगी मंदिर सरकार आपल्या नियंत्रणात घेऊन त्या मंदिराची ट्रस्ट जेव्हा स्थापन करेल, तेव्हा त्या ट्रस्टचे सदस्य वा त्या अंतर्गत सेवांमध्ये भरल्या जाणाऱ्या पदांबाबत जर फक्त हिंदू उमेदवारच हवे असतील, तर ते त्या सर्व जागा हिंदू उमेदवारांसाठी आरक्षित करु शकतात. 

   अशा प्रकारे अनुच्छेद १६ हे सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत समानता देणारे कलम आपण ह्या लेखमालेतील भाग २२ ते २७ मध्ये विस्ताराने बघितले. 

     क्रमशः

                संकलन-नुरखॉं पठाण

                गोरेगाव-रायगड

                7276526268

Comments

Popular posts from this blog

आपले संविधान भाग४: भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये

आपले संविधान भाग-१७

आपले संविधान भाग ६: संविधानाचे प्रास्ताविक