आपले संविधान भाग-१३
आज आपण N.R.I. नागरिकांनसंदर्भात असलेले अनुच्छेद आठ बाबत सविस्तर माहिती बघुया. सोबत P.I.O. आणि O.C.I. कार्ड काय आहे, ते पण पाहुया.
अनुच्छेद-८:-मुळच्या भारतीय असलेल्या, पण भारताबाहेर राहणा-या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क-
अनुच्छेद ५ मध्ये काहीही असले तरी, जी व्यक्ती किंवा जिच्या मातापित्यांपैकी किंवा आजा-आजींपैकी कोणीही एक गव्हर्नमेंट आॅफ इंडिया अॅक्ट १९३५ (मुळात अधिनियमित केल्याप्रमाणे) यात व्याख्या केलेल्या भारतात जन्मले होते आणि जी त्याप्रमाणे व्याख्या केलेल्या भारताच्या बाहेरील कोणत्याही देशात सामान्यतः निवास करत आहे अशी कोणतीही व्यक्ती, जर तिने त्या काळी ज्या देशात ती राहत असेल त्या देशातील भारताच्या राजदौतिक किंवा वाणिज्यदौतिक प्रतिनिधीकडे, डोमिनिअन ऑफ इंडियाच्या सरकारने किंवा भारत सरकारने विहीत केलेल्या नमुन्यात व रीतीने या संविधानाच्या प्रारंभापूर्वी वा नंतर नागरिकत्वासाठी केलेल्या अर्जावरुन अशा राजदौतिक किंवा वाणिज्यदौतिक प्रतिनिधीने तिची भारताची नागरिक म्हणून नोंदणी केलेली असेल तर, ती व्यक्ती भारताची नागरिक असल्याचे मानले जाईल.
संविधानातील हे कलम सर्वसाधारणपणे N.R.I. लोकांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. मुळचे भारतीय असलेले परंतू काही कारणास्तव विदेशात वास्तव्य करणाऱ्यांबाबत हे कलम आहे.
भारत सरकारने अशा व्यक्तींसाठी P.I.O. आणि O.C.I. असे दोन प्रकारचे कार्ड जारी केलेले आहेत. P.I.O.-- Person of lndian Origin म्हणजेच भारतीय मूळ व्यक्ती आणि O.C.I.-- Overseas Citizen of India म्हणजेच भारताबाहेरील नागरिक कार्डधारक. एकप्रकारे याला आपण दुहेरी नागरिकता देखील म्हणू शकतो. तसं बघितलं तर भारतीय राज्यघटनेने एकल नागरिकत्वाचा स्विकार केलेला आहे, परंतू काही विशिष्ट प्रकारच्या व्यक्तींसाठी की ज्या मुळच्या भारतीय आहेत, अशांसाठी भारत सरकारने हे दोन प्रकारचे कार्ड जारी केलेले आहेत.
क्रमशः
संकलन-नुरखॉं पठाण
गोरेगाव-रायगड
Comments
Post a Comment