आपले संविधान भाग४: भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये

 भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये

वैशिष्ट्य क्र.-४:- लोककल्याणकारी राज्याचा पुरस्कार:-

राज्यघटनेतील मार्गदर्शक धोरणांचा उद्देश व्यक्तीचा सर्वांगीण विकास साध्य करुन कल्याणकारी राज्य निर्माण करने हाच आहे. धर्म, जात, वंश, प्रदेश असा कोणताही भेदभाव लोककल्याणाच्या बाबतीत न करता प्रत्येक व्यक्तीचा राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकास साध्य करण्याची जबाबदारी शासनाची आहे.

   वैशिष्ट्य क्र. ०५:- मुलभूत हक्कांचा समावेश:-

  भारतीय राज्यघटनेच्या भाग तीनमध्ये मुलभूत हक्कांचा समावेश केलेला आहे. राज्यघटनेतील कलम १२ ते ३५ ही कलमे नागरिकांचे मूलभूत हक्क स्पष्ट करतात. घटनाकारांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना अभिव्यक्ती, संचार, व्यवसाय व अशे बरेचशे स्वातंत्र्य बहाल केलेले आहेत. कोणी ह्या अधिकारांचे हनन करत असेल तर न्यायालयात जावून दाद मागण्याचा देखील अधिकार दिला आहे.

   वैशिष्ट्य क्र.०६:- मुलभूत कर्तव्यांचा समावेश:-

   संविधानाच्या भाग चार मधील कलम ५१-क मध्ये आपणा सर्व भारतीयांची मुलभूत कर्तव्य विस्ताराने दिलेली आहेत. संविधानाच्या ४२ व्या घटना दुरुस्ती नुसार ही कलमे संविधानाचा भाग बनली आहेत. आपण आपले अधिकार आणि हक्क मागत असतांना देशाप्रती असलेल्या कर्तव्यांची देखील जाणिव ठेवणे महत्त्वाचे आहे. अर्थातच ही संविधानिक कर्तव्य इमानदारीने पुर्ण करणारेच खरे देशभक्त असतात.

   वैशिष्ट्य क्र-०७:- संसदीय लोकशाहीचा स्विकार:-

  भारतीय संविधानाने संसदीय लोकशाहीचा स्विकार केलेला आहे. ग्रामपंचायती पासून ते लोकसभेपर्यंत मतदार आपले प्रतिनिधी निवडून देतात. संविधान भारतात लागू होण्याआधी राज्यकर्ता हा राणीच्या उदरातून जन्म घेत असे पण आता तो मतपेटीतून जन्माला येतो. त्यामुळे आपला पुढिल पाच वर्षांसाठी प्रतिनिधी कोण असावा याचे खूप विचारपूर्वक आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्णय घेणे खूप महत्त्वाचे आहे.

  क्रमशः

          संकलन-नुरखॉं पठाण

                 गोरेगाव-रायगड

Comments

Popular posts from this blog

आपले संविधान भाग-१७

आपले संविधान भाग ६: संविधानाचे प्रास्ताविक