आपले संविधान भाग-१४
आज आपण आपले भारतीय नागरिकत्व कसे रद्द होते, याबाबतचे कलम ९ बाबत सविस्तर जाणून घेऊया.
अनुच्छेद -९:-परकिय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादणाऱ्या व्यक्ती नागरिक नसणे-
कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परकिय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादिले असेल तर, ती व्यक्ती अनुच्छेद-५ च्या आधारे भारताची नागरिक असणार नाही, अथवा अनुच्छेद-६ किंवा अनुच्छेद-८ च्या आधारे भारताची नागरिक आहे, असे मानले जाणार नाही.
अनुच्छेद-९ नुसार व्यक्तीने परदेशी नागरिकत्व स्विकारले तर भारतीय नागरिकत्व रद्द होते. यासोबतच अन्य पुढील कारणांनी देखील ते रद्द होवू शकते:-
१) स्वेच्छेने नागरिकत्व सोडणे:- जर एखाद्या प्रौढ व्यक्तीने स्वेच्छेने नागरिकत्व सोडण्याबाबत विशेष अधिकाऱ्यांकडे अर्जित जाहिर केले, तर नागरिकत्व रद्द होते.
२) अनुच्छेद-९ मध्ये सांगितल्या प्रमाणे स्वेच्छेने इतर देशाचे नागरिकत्व स्विकारल्यास भारतीय नागरिकत्व रद्द होते.
३) भारत सरकार पुढील कारणांनी देखील नागरिकत्व रद्द करू शकते:-
अ) जर एखाद्या व्यक्तीने फसवणूक करून किंवा खोटी विधाने करून किंवा आवश्यक गोष्टी लपवून नागरिकत्व मिळवले असेल, तर योग्य माहिती मिळाल्यावर नागरिकत्व रद्द केले जाऊ शकते.
आ) घटनेचा अनादर:- जर एखाद्या भारतीय व्यक्तीने राज्यघटनेबद्दल अनादर दर्शविला असेल किंवा संविधानाबद्दल त्याच्या मनात द्वेशाची भावना असेल.
इ):- राष्ट्रद्रोह:- एखाद्या व्यक्तीने भारताशी देशद्रोह केला असेल किंवा युद्ध प्रसंगी शत्रू देशाला मदत केली असे सिद्ध झाल्यास.
ई):- दुसऱ्या देशात दीर्घ मुक्काम:- एखाद्या व्यक्तीने भारत सरकारच्या परवानगीशिवाय इतर देशात सात वर्षे वास्तव्य केले असल्यास आणि भारतीय दुतावासात भारतीय नागरिकत्व कायम ठेवण्याच्या इच्छेने दरवर्षी नावनोंदणी केली नाही तर त्याचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येऊ शकते.
उ):- देशातील शिक्षेच्या गुन्ह्यापासून:- एखाद्या व्यक्तीने नोंदणी किंवा नैसर्गिकरण करुन नागरिकत्व मिळवले असेल आणि नागरिकत्व मिळवण्याच्या पाच वर्षांच्या आत एखाद्या देशात किमान दोन वर्षाची शिक्षा ठोठावली गेली असेल, तर त्याचे नागरिकत्व संपुष्टात येऊ शकते.
भारत सरकार एखाद्या व्यक्तीची नागरिकत्व संपविण्यापूर्वी त्याला त्याची सफाई देण्याची पुर्ण संधी देते.
राष्ट्रकुल नागरिकत्व:- भारत हे राष्ट्रकुल देशांचा सदस्य असल्याने इतर सदस्य असलेल्या देशातील नागरिकांना भारताचे राष्ट्रकुल नागरिकत्व बहाल करते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यान अशा नागरिकांना काही हक्क देखील देण्यात येतात.
क्रमशः
संकलन-नुरखॉं पठाण
गोरेगाव-रायगड
Comments
Post a Comment