आपले संविधान भाग ५: भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये

 भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये

   वैशिष्ट्य क्र-०८:- स्वातंत्र न्यायव्यवस्था:- भारताच्या राज्यघटनेने स्वातंत्र न्यायमंडळाचा पुरस्कार केलेला आहे. न्यायमंडळावर दडपण येऊ नये म्हणून न्यायाधीशांचे निवृत्ती वय, त्यांचा कार्यकाळ घटनेने निश्चित केलेला आहे. विविध प्रकारचे न्याय मिळविण्यासाठी कोणत्याही दबावापासून मुक्त असणारी न्यायव्यवस्था निर्माण केलेली आहे.

   वैशिष्ट्य क्र-०९:- एकेरी नागरिकत्व:- भारत हे संघराज्य असुनही भारतीय राज्यघटनेने एकेरी नागरिकत्वाचा स्विकार केलेला आहे. त्यामुळे आपली सर्वांची ओळख आसेतूहिमाचल केवळ भारतीय आणि भारतीयच आहे. यातून आपल्या एकतेची आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ होते.

   वैशिष्ट्य क्र-१०:- निधर्मी राज्य:- भारतीय राज्यघटनेने निधर्मी राज्याचा स्विकार केलेला आहे. देशाचा अधिकृत असा कोणताही धर्म नसेल. प्रत्येक नागरिक हा केवळ भारतीय म्हणुन त्याच्या कल्याणाची जबाबदारी ही शासनाची असेल, असे निधर्मी कल्याणकारी राज्याचा पुरस्कार आपल्या राज्यघटनेने केलेला आहे.

   वैशिष्ट्य क्र-११:- मतदानाचा अधिकार:- भारतातील सर्व नागरिकांना धर्म, जात, वंश, लिंग, प्रांत, गरीब, श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. एक व्यक्ती एक मत नुसार सर्वांच्या मताला समान मुल्य बहाल करण्यात आले आहे. सुरवातीला वयाची २१ वर्ष पुर्ण झालेल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. मात्र  १९८९ मध्ये ५१ व्या घटनादुरुस्तीने हे वय १८ वर्ष करण्यात आले.

   वैशिष्ट्य क्र-१२:- त्रिस्तरीय सरकारची स्थापना:- लोकशाही मुल्य अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत रुजावित , सरकार नेमके कसे काम करते हे कळाव आणि अगदी गावपातळीवरून देखील नेतृत्व निर्माण व्हावेत, यासाठी त्रिस्तरीय सरकारची स्थापना राज्यघटनेने पुरस्कृत केलेली आहे. पंचायत राज, राज्य सरकार व केंद्र सरकार अशी ही त्रिस्तरीय सरकारची योजना आहे. पंचायत राज यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांचा समावेश होतो.

   अश्या प्रकारे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी आपली भारतीय राज्यघटना आहे.

      क्रमशः

            संकलन-नुरखॉं पठाण

                   गोरेगाव-रायगड

Comments

Popular posts from this blog

आपले संविधान भाग४: भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये

आपले संविधान भाग-१७

आपले संविधान भाग ६: संविधानाचे प्रास्ताविक