आपले संविधान भाग ०८
कालच्या भागात आपण भाग-०१ मधील अनुच्छेद-१ बाबत विचार केला. आज आपण अनुच्छेद-२ बाबत जाणून घेऊया.
अनुच्छेद-२:- नवीन राज्य दाखल करुन घेणे किंवा स्थापन करणे:-
संसदेला, तिला योग्य वाटतील, अश्या अटींवर व शर्तींवर कायद्याद्वारे नवीन राज्ये संघराज्यामध्ये दाखल करुन घेता येतील किंवा स्थापण करता येतील.
२-क:- सिक्कीम हे संघराज्याशी सहयोग करणे. "संविधान (३६वी सुधारणा) अधिनियम १९७५" कलम ५ द्वारे निरसित(२६ एप्रिल १९७५ रोजी व तेव्हापासून).
अनुच्छेद-२ नुसार भारतात नवीन राज्यांचा प्रवेश किंवा त्यांची स्थापना होवू शकते. आपणास माहीती असेल की स्वातंत्र्यानंतर भारतात अनेक राज्यांची निर्मिती झालेली आहे. आता आपण नविन कोणकोणते राज्य निर्माण झालेली आहेत ते पाहुया;
१) १९५३ साली भाषेच्या आधारावर आंध्रप्रदेश ह्या राज्याची सर्वप्रथम निर्मिती झाली.
२) १९६० साली भाषेच्या आधारावर महाराष्ट्र आणि गुजरात ह्यांची स्थापना झाली.
३) १९६३ साली आसाम राज्यातून नागालँड हे राज्य स्थापन झाले.
४) १९६६ -- हरियाणा
५) १९७२ साली मेघालय, मणिपूर आणि त्रिपुरा ह्या तीन राज्यांची स्थापना झाली.
६) १९७५ -- सिक्कीम
७) १९८७ साली मिझोरम, अरुणाचल प्रदेश व गोवा ह्या तीन राज्यांची स्थापना झाली.
८) १ नोव्हेंबर २००० -- छत्तीसगड
९) ९ नोव्हेंबर २००० --उत्तर प्रदेशातून उत्तराखंड राज्य स्थापन झाले.
१०) १५ नोव्हेंबर २००० -- झारखंड
११) २ जून २०१४ रोजी तेलंगाना राज्याची निर्मिती झाली.
वरील सर्व राज्यांची निर्मिती ही संविधानातील अनुच्छेद-२ नुसार करण्यात आली आहे.
क्रमशः
संकलन:- नुरखाॅं पठाण
गोरेगाव-रायगड
Comments
Post a Comment