आपलं संविधान भाग-२१

 भाग-तिसरा:- मुलभूत अधिकार

   आजच्या भागात आपण कलम-१५ तील उर्वरित नियम 5 बाबत सविस्तर माहिती बघुया...

  अनुच्छेद-१५:- धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई....

   या आधिच्या भागात आपण नियम 1, 2, 3 व 4 बाबत माहिती घेतलेली आहे.

   5. या अनुच्छेदामधील किंवा अनुच्छेद १९ चा खंड(१),  उपखंड (छ) यामधील कोणत्याही गोष्टीमुळे, नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गांच्या उन्नतीकरिता अथवा अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता, कायद्याद्वारे, कोणतीही विशेष तरतूद करण्यास, जेथवर अशा तरतुदी, अनुच्छेद ३० च्या खंड (१)  मध्ये निर्देशिलेल्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांखेरिज, अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये-- मग त्या राज्याकडून अनुदानप्राप्त असोत अगर अनुदानप्राप्त नसोत-- प्रवेश देण्याशी संबंधित असतील तेथवर, राज्याला प्रतिबंध होणार नाही.

   या कलमामध्ये धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक ठरवलेल्या शैक्षणिक संस्थांखेरिज इतर सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण वा फी सवलत सारख्या योजना राबविण्यास सरकारला अनुमती देण्यात आली आहे.

      अलीकडेच २०१९ मध्ये अनुच्छेद-१५ मध्ये १०३ वी घटनादुरुस्ती करून एक सहावा कलम जोडण्यात आला आहे. त्यानुसार वेळोवेळी राज्य आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांकडेही लक्ष देईल. 

     ही घटनादुरुस्ती करून सरकारने खुल्या वर्गातील आर्थिकदृष्टया मागासांना सरकारी नोकरीत आणि शिक्षणात १०% आरक्षण देण्यासाठी १२४ वी घटनादुरुस्ती केली. 

   १०% सवर्ण आरक्षणाचे निकष:- वार्षिक उत्पन्न ८ लक्ष पेक्षा कमी असावे; ५ हेक्टर पेक्षा कमी शेती असावी; स्वमालकिचे घर असल्यास १००० चौरस फूटापेक्षा कमी क्षेत्रफळाचे असावे; महापालिका क्षेत्राच्या बाहेर भूखंड असल्यास २०९ यार्डापेक्षा कमी क्षेत्रफळाचा असावा.

    क्रमशः

                 संकलन-नुरखॉं पठाण

                गोरेगाव-रायगड

                 7276526268

Comments

Popular posts from this blog

आपले संविधान भाग४: भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये

आपले संविधान भाग-१७

आपले संविधान भाग ६: संविधानाचे प्रास्ताविक