आपलं संविधान भाग-१८
भाग-तिसरा :- मुलभूत अधिकार आज आपण समानता या मुलभूत अधिकाराविषयी अनुच्छेदांनुसार सविस्तर माहिती बघुया__ अनुच्छेद १४:- कायद्यापुढे समानता---- राज्य, कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. हे अनुच्छेद वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की, या अनुच्छेदात दोन महत्त्वाच्या संकल्पना मांडण्यात आलेल्या आहेत-- १) कायद्यापुढे समानता:- ही संकल्पना कोणत्याही व्यक्तीच्या बाजूने विशेषाधिकार नसल्याचे दर्शविते. याचा अर्थ असा की, कोणतीही व्यक्ती मग ती कोणत्याही जाती-धर्माची असो, गरिब वा श्रीमंत असो, कितीही मोठी अधिकारी वा पदाधिकारी असो, कोणीही असो, कायद्यापेक्षा मोठी नाही. त्यांना देशातील सर्व न्यायालयाद्वारे चालवलेल्या कायद्यासमोर समान वागणूक दिली पाहिजे. आणि म्हणुनच कदाचीत न्यायदेवतेच्या डोळ्यांवर काळी पट्टी असते, ज्याचा अर्थ समोर कोण आहे, हे न बघता निःपक्षपातीपणे न्यायदान केले जाते. २) कायद्याचे समान संरक्षण:- कायद्याद्वारे दिलेले विशेषाधिकार आ...